अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यातील पोहेगांव येथील मालवे सराफा दुकानात मंगळवारी दिवसाढवळ्या चार डाकूंनी सराफा दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी साध्या वेशात दुकानात आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने एकट्यानेच त्यांचा खंबीरपणे मुकाबला केला. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
घटनेच्या दिवशी, मंगळवारी, रवी चीने नावाचा पोलीस कर्मचारी आपल्या मुलासोबत कान टोचण्यासाठी मालवे सराफा दुकानात आले होते. याच दरम्यान, दुपारी चार डाकू बंदूक आणि तलवारी घेऊन दुकानात घुसले. त्यांनी दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांना धमकावून सुमारे तीन किलो सोनं आणि तीन किलो चांदी लुटून नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रवी चीने यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.
रवी चीने यांनी डाकुंशी अकेलेच दोन हात केले. यामुळे घटनास्थळी मोठी खळबळ उडाली. रवी चीने यांना पाहून परिसरातील लोकही मदतीसाठी धावून आले. त्यांनी तलवार फिरवणाऱ्या डाकूंना वेढा घालून तिथेच पकडले. त्यानंतर तीन डाकुंना बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रवी चीने सिन्नर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत आणि पोहेगावच्या शेजारील पाथरे गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यात एका सराफ दुकानावर दिवसाढवळ्या दरोडा टाकल्याची घटना#Crime #CCTV pic.twitter.com/7vQBtvvUBv
— News18Lokmat (@News18lokmat) January 23, 2025
रणजी ट्रॉफी: मैदान न छोड़ने पर कप्तान को मिली सजा , जानें पूरी कहानी
स्विगी बॉय ने वीडियो में इस्तीफा दिया, मांस-शराब डिलीवरी से इनकार
गुरुग्राम में शहीद हुए इंस्पेक्टर सुनील, एनकाउंटर में चार बदमाशों को किया था ढेर
नसीब पर नहीं, कर्म पर भरोसा जगाएगा यह वीडियो
iPhone 17 का डिजाइन हुआ लीक, सालों बाद बदल सकता है कैमरे का खास हिस्सा!
सांप ने किया प्राइवेट पार्ट पर हमला, वीडियो वायरल
बालों की दुनिया का अजूबा : 2 मीटर लंबे बालों वाली महिलाओं से गूंज रहा ये गांव, जानिए रहस्य
इस शख्स को गौर से देख लीजिए, दिल्ली में बैठकर हजारों लोगों को लगा चुका है लाखों की चपत, अगला नंबर हो सकता है आपका?
VIDEO: कौन हैं सिद्धार्थ देसाई? एक ही पारी में 9 विकेट लेकर मचाई सनसनी, रणजी में रच डाला इतिहास
जान से मारने की धमकी पर राजपाल यादव टूटे, ऑडियो जारी कर कहा- मैंने किसी से बात नहीं की..